JavaScript is not enabled.

अनुक्रमांक उपक्रम परिपत्रक फॉर्म दिनांक
शिशुमंदिर ०६/०४/२०१६
पाळणाघर १५/०६/२०१६
वाचनालय ०५/०४/२०१६
ग्रंथालय १९/१०/२०१३
अभ्यासिका ०१/१०/२०१४
शिवण वर्ग ( मंडळाचा शिवण वर्ग व सरकारमान्य शिवण वर्ग ) ०६/०४/२०१६
हस्तव्यवसाय वर्ग ०६/०४/२०१६
शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्ग २५/५/२०१८

अन्य उपक्रम

   जागेच्या आणि प्रशिक्षकांच्या उपलब्धतेनुसार मंडळ स्थानिक स्तरावर काही उपक्रम राबविते. कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना माफक दरात या सुविधांचा लाभ घेता येतो. इतर नागरिकही या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

काही निवडक उपक्रम पुढीलप्रमाणे -

   १. जलतरण तलाव :कामगार क्रीडा भवन - मुंबई, कामगार कल्याण भवन, राजेरघुजीनगर- नागपूर आणि कामगार कल्याण भवन, सहकारनगर - पुणे या तीन प्रकल्पाच्या ठिकाणी जलतरण तलाव आहेत.

   २. व्यायामशाळा :जागेच्या उपलब्धतेनुसार मंडळाच्या राज्यात १७ व्यायामशाळा आहेत. यात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश दिला जातो. व्यायामशाळांमध्ये प्रशिक्षक देखील आहेत. कामगार कल्याण भवन, ललित कला भवन व काही प्रमुख कामगार कल्याण केंद्रांत या व्यायामशाळा आहेत.

   ३. बॅडमिंटन कोर्ट :मुंबई, पुणे, नागपूर येथे मंडळाचे बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध आहेत.

   ४. टेबल टेनिस कोर्ट :मुंबई, पुणे, अकोला या ठिकाणी मंडळाचे टेबल टेनिस कोर्ट आहेत.

   ५. जिम्नॅस्टीक वर्ग :कामगार कल्याण भवन, राजेरघुजी नगर - नागपूर येथे सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते.

   ६. संगणक वर्ग :मुंबई, पुणे, नागपूर येथे संगणक प्रशिक्षण सुरु आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे संगणक प्रोग्रामिंग, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, टॅली, डीटीपी, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, एमएस-सीआयटी आदी अभ्यासक्रम शिकविण्यात येतात.

   ७. ब्युटीपार्लर कोर्स :कामगार कुटुंबिय महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे वर्ग सुरु केले आहेत. ललित कला भवन, नायगाव येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रमानुसार वर्ग सुरू आहे. कामगार कल्याण भवन, राजे रघुजीनगर येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे वर्ग चालविले जातात. शिवाय, काही ठिकाणी ७५ टक्के व २५ टक्के तत्वावर विविध संस्थांच्या मार्फत वर्ग चालविण्यात येतात.

   ८. नृत्य वर्ग :मुबंईत कामगार क्रीडा भवन - एल्फिन्स्टन, कामगार कल्याण भवन - अभुदयनगर, काळाचौकी आणि अंधेरी, ललित कला भवन, सानेगुरुजी पथ - वरळी, नायगाव व ना.म.जोशी मार्ग येथे आणि औरंगाबाद विभागात कामगार कल्याण भवन - सेलू येथे नृत्य वर्ग चालविले जातात.

   ९. टेक्निकल इन्स्टिट्यूट अभ्यासक्रम :ललित कला भवन, सिडको - नाशिक येथे टेक गुरु मल्टीपर्पज इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने ७५ : २५ तत्वावर हा वर्ग सुरु आहे. यात इलेक्ट्रीकल, ऑटो मोबाईल, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर / हार्डवेअर, फिटर, सीएनसी प्रोग्रामिंग, फॅशन डिझायनिग, ब्युटीपार्लर, मोबाईल रेपेरिंग आदी प्रशिक्षण दिले जाते.