JavaScript is not enabled.

कामगार कल्याण निधी -

   अधिनियमाच्या कलम ३ नुसार कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो.

   १ कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमा.
   २ कलम ६ - अ अन्वये ज्या निधीकडे हस्तांतरित करण्यात आल्या असतील अशा न दिलेल्या संचित रकमा.
   ३ कलम ६ ब अन्वये दंडादाखल दिलेले कोणतेही व्याज.
   ४ कलम ६ बब अन्वये दिलेले कोणतेही अंशदान.
   ५ स्वचेछेने दिलेल्या कोणत्याही देणग्या.
   ६ कलम ७, पोटकलम (५) अन्वये हस्तांतरित केलेला कोणताही निधी.
   ७ कलम ८ अन्वये कर्जाऊ घेतलेली कोणतीही रक्कम.
   ८ राज्य शासनाने दिलेले कोणतेही कर्ज, सहायक अनुदान किंवा अर्थसहाय्य.

अधिनियम लागू असलेल्या आस्थापना -

   १ कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत येणारे सर्व कारखाने.
   २ मोटार वाहतुक कामगार अधिनियम १९६१ लागू होतो अशा ट्रॅव्हल एजन्सी / ट्रान्सपोर्ट कंपनी.
   ३ मुंबई दुकाने आणि आस्थापना अधिनियम १९४८ च्या लागू होतो असे सर्व दुकाने व आस्थापना (ज्यात किमान ५ कामगार / कर्मचारी असतील किंवा मागील १२ महिन्यात कोणत्याही एका दिवशी ५ किंवा अधिक व्यक्तिंची नेमणूक केली असेल).
   ४ कारखाना अधिनियम १९४८ लागू होतो अशा आस्थापना.

वरील अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या महाराष्ट्र राज्यात कार्यरत आस्थापना, कंपन्या, कारखाने, दुकाने, बँका, हॉस्पिटल्स, टूर्स आणि ट्रव्हल्स कंपन्या, विविध कंत्राटदार, ठेकेदार आदी सर्व वाणिज्य / व्यावसायिक संस्थांना सदर अधिनियम लागू असून मंडळाकडे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे.

त्रिपक्षीय अंशदान दर -

   अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार मंडळाकडे दर सहा महिन्यात जून आणि डिसेंबरमध्ये खालीलप्रमाणे अंशदान मंडळाकडे भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे.

तपशिल कामगार मालक शासन
दरमहा पगार (रुपये) (रुपये) (रुपये)
अ ) रु. ३०००/- पर्यंत ६.०० १८.०० १२.००
ब ) रु. ३०००/- पेक्षा जास्त १२.०० ३६.०० २४.००