JavaScript is not enabled.

राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा - सन २०१९-२०

स्थळ - सांस्कृतिक सभागृह, जळगाव जामोद, जि. बुलढाणा

बुलढाणा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेचे जळगाव जामोद जि.बुलढाणा येथे दि.१० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहात सदर स्पर्धा पार पडली. यावेळी व्यासपीठावर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, जळगाव जामोदच्या नगराध्यक्षा सीमाताई कैलास डोबे, शेगावच्या नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, संग्रामपूर नगर पंचायतीचे अध्यक्ष हरिभाऊ राजनकार, जळगाव-जामोद पंचायत समितीच्या सभापती गीताताई बंडल, संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापती तुळसाबाई भारत वाघ, शेगाव पंचायत समितीचे सभापती विठ्ठल पाटील, जळगाव जामोद न.पा.उपाध्यक्षा रत्नप्रभा शिरोडकर, शेगावच्या न.पा. उपाध्यक्षा श्रीमती कचरे, अपर्णाताई संजय कुटे, प्र.कल्याण आयुक्त महेंद्र तायडे, जनसंपर्क अधिकारी मनोज बागले, प्र.सहायक कल्याण आयुक्त अरुण कापसे, कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे, सत्यजित चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक गट कार्यालय अकोला, द्वितीय पारितोषिक गट कार्यालय अमरावती, तृतीय परितोषिक गट कार्यालय अंधेरी यांनी पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक नागपूर २ आणि सांगली या गटांना देण्यात आले. विजयी संघांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळाच्या राज्यातील विविध गट कार्यालय स्तरावर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. गट कार्यालय स्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त १६ संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचे परीक्षण देवेंद्र देशमुख, स्नेहल सुमंत साघू, रवि गिरी यांनी केले. आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केले.

वृक्षारोपण २०१९

स्थळ - कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दि.१ जुलै २०१९ रोजी कामगार क्रीडा भवन, एलफिन्स्टन, मुंबई येथे वृक्षारोपण करताना मा.कामगार मंत्री डॉ.संजय कुटे. समवेत कामगार विभागाचे प्रधान सचिव श्री.राजेश कुमार, कामगार आयुक्त श्री.राजीव जाधव, सहसचिव डॉ.महेंद्र कल्याणकर, अवर सचिव श्री.सतीश भारतीय, प्र.कल्याण आयुक्त श्री.महेंद्र तायडे आदी मान्यवर.

राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २०१८-१९

स्थळ - जयभवानी प्रशाला क्रीडांगण, भवानीपेठ, सोलापूर

सोलापूर - जयभवानी प्रशाला क्रीडांगण, भवानीपेठ, सोलापूर दि.२३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर स्पर्धा पार पडल्या. एकूण १०३ पैलवानांनी स्पर्धेत भाग घेतला. कामगार केसरीचा किताब सदगुरु सह.साखर कारखान्याचा पैलवान आशिष वावरे याने पटकावला. रु.२५०००/- रोख, चांदीची गदा, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यास गौरविण्यात आले. कुमार केसरीचा किताब कुंभी कासारी सह.साखर कारखान्याचा पैलवान अनिकेत पाटील याने पटकावला. रु.१५०००/- रोख, चांदीची गदा, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यास गौरविण्यात आले. तत्कालिन कामगार राज्यमंत्री श्री.विजय देशमुख व खासदार एड.शरद बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

६६ व्या राज्यस्तरीय व ११ वा औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य महोत्सव २०१८-१९

स्थळ - कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई

राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कबड्डी स्पर्धा २०१८-१९

स्थळ - कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई

औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २४ वी व महिलांची १९ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दि.१४ ते १९ फेब्रुवारी २०१९ दरम्यान कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी स्टेशनजवळ, मुंबई येथे पार पडली. स्पर्धेत १०२ संघांचे १५०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. पुरुष शहर विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट, ग्रामीण विभागात जे.एस.डब्लू - डोलवी, महिला विभागात देना बँक स्पोर्ट्स क्लब - मुंबई अंतिम विजेते ठरले. पारितोषिक वितरण आमदार तथा मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू श्री.राजू भावसार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

वर्ष २०१८ पर्यंतची निवडक छायाचित्रे